नवलाख उंबरे जवळील जाधववाडी धरण येथे जलविहारासाठी आलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 26 मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अंगदकुमार लखन गुप्ता (वय 26, रा. कोथरूड, पुणे. मूळ रा. अमृतसर, पंजाब) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, अंगतकुमार लखन गुप्ता आणि त्याच्या मित्रांनी गुगलवर पर्यटनाचे ठिकाण शोधले. त्यानंतर भर उन्हात जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले. धरणावर पोहचल्यानंतर त्यांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. मात्र पाण्यात चेष्टा मस्करी करताना एक खोल खड्ड्यात चौघांचा पाय रुतला. त्यांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा सुरु केली. त्यांचा आवाज ऐकल्यावर परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांना वाचवले. मात्र अंगतकुमार लखन गुप्ता या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. ( youth from Punjab state drowned in Jadhavwadi dam in Maval taluka Pune )
सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस, एनडीआरएफ पथक, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम सुरु केली. दरम्यान वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांचे सदस्यही घटनास्थळी आले. थोड्याचवेळात अंगद कुमारचा मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! दहावीचा निकाल जाहीर, संपूर्ण राज्याचा निकाल 95.81 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, वाचा निकालाची ठळक वैशिष्ट्ये
– पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, फोन आणि रोकड केली लंपास, तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
– श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval