Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी (साते) येथे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित मनोरंजन संध्या 2025 हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. ह्या कार्यक्रमाला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
गावागावातील महिलांनी पारंपरिक व आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – पुष्पलता बोऱ्हाडे यांनी तर द्वितीय क्रमांक -माधुरी नवघणे तृतीय क्रमांक -रेखा विनोदे यांनी पटकावला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे, मा सरपंच वर्षा नवघणे, मा उपसरपंच संध्या शेळके, वंदना शिंदे, अश्विनी विनोदे, कविता विनोदे, विद्या शेवकर, सोनल सुर्यवंशी यांच्यासह गावातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रशांत दादा भागवत यांनी नेहमीच गावागावातील महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.”
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळातील महिलांची एकजूट अधोरेखित झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचे पाठबळ हेच प्रशांत दादा भागवत यांच्या विजयाचे मुख्य बळ ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी