Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी – शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) या तीन पक्षांची युती असेल, अशी चर्चा होत असतानाच आता केवळ शिवसेना आणि भाजपा यांचेच ठरले असून आरपीआयची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याची माहिती मिळत आहे. तिन्ही पक्षांच्या तालुक्यातील प्रमुख नेत्यांसोबत ‘दैनिक मावळ’ने संपर्क केल्यानंतर ही माहिती समोर आली असून युतीची अधिकृत घोषणा केलेली नसल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा आणि शिवसेना या पक्षांच्या पदाधिकारी यांनी मात्र, ‘आमचं ठरलंय’ असं सांगितलं असून आरपीआय असेल किंवा आणखीन कोणते पक्ष सोबत येणार याबद्दल अजूनही चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत याबद्दल अंतिम मत होऊन ते जाहीर केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. तर दुसरीकडे आरपीआय पक्षाचे पदाधिकारी यांनी आमची अद्याप कोणासोबत युती झालेली नाही, परंतु कुणासोबत जायचे आणि कुणासोबत नाही, याबद्दल दोन दिवसांत निर्णय होईल आणि तो कळवू असे सांगितले आहे.
दरम्यान, शुक्रवार (दि. 16 ) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालेली असताना आतापर्यंत पंचायत समिती मावळच्या दहा जाहा आणि जिल्हा परिषदेच्या 5 जागां अशा पंधरा जागांपैकी केवळ चार ते पाच जागांवरील चित्र स्पष्ट झालेले असून उर्वरित जागांवरील उमेदवार समजणे बाकी आहे. अशात युती, आघाडी यांच्या चर्चा सुरूच असल्याने इच्छुक उमेदवार देखील गॅसवर आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

