Dainik Maval News : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2024 केंद्रस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे येथील शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धांमध्ये टाकवेतील विद्यार्थ्यांनी सर्वच खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत आपले वर्चस्व दाखविले. स्पर्धेत कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ,लोकनृत्य, कविता गायन, भजन, लंगडी, लेझीम, धावणे व प्रश्नमंजुषा इत्यादी क्रिडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग गोल्ड मेडल विजेती कुमारी हर्षदा शरद गरुड हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ,लोकनृत्य,कविता गायन, भजन, लंगडी, लेझीम,धावणे व प्रश्नमंजुषा आशा विविध 26 स्पर्धांमध्ये टाकवे बुद्रुक केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवीतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक बौद्धिक व मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून खेळांमध्ये संघभावना आणि व्यक्तिमत्व विकास होत असल्यामुळे खेळात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन कुमारी हर्षदा गरुड हिने केले. तर केंद्रप्रमुख संगीता भालघरे यांनी खेळात प्रगती करून विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे, जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले.
यावेळी टाकवे गावच्या सरपंच सुवर्णा असवले उपसरपंच प्रतीक्षा जाधव, प्राचार्य आनंद जांभुळकर, एचडीएफसी बँकेचे मॅनेजर राजेन्द्र काळे, मुख्याध्यापक अतुल गायकवाड, प्रकल्प अधिकारी अमोल जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मालपोटे, गणेश काटकर, श्रीकांत मोढवे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू, भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नम्रता मॅडम यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव