मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या तुंग किल्ल्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठ्यांच्या इतिहासात नोंद असणारा तुंग किल्ला शिवकालीन पराक्राची साक्ष देतो. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या अधिक आहे. परंतू, मागील अनेक वर्षांत किल्ल्याची झालेली पडझड, पायऱ्यांची झालेली झीज यामुळे किल्ल्यावर सहज जाणे किंवा तिथे पर्यटन करणे शक्य होत नाही. मात्र पुरातत्व विभागाच्या उपलब्ध निधीतून तुंग दुर्गसंवर्धनाचे कार्य पार पाडता येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या मागील तीन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र (मावळ) मार्फत किल्ले तुंग उर्फ कठिणगडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सातत्याने किल्ले तुंगच्या संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत आणि सादर केलेल्या किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार राज्य पुरात्व खात्याकडून किल्ले तुंग (कठिणगड) वर सुरू असलेल्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी 1 कोटी 56 लाख रुपये निधी मंजुर केला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे यांनी दैनिक मावळला ही माहिती दिली. ( 1 Crore 56 Lakh Fund sanctioned by State Archeology Department for Tung Fort Conservation Project )
अधिक वाचा –
– मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival
– वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade
– महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवणार; मावळ तालुका काँग्रेसकडून नवी आरोग्य मोहीम । Maval News