आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील भोयरे फाटा ते कल्हाट फाटा (इजिमा 61) या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प-2023 अंतर्गत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवार (दिनांक 29 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन किलोमीटर असलेल्या सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. भोयरे फाटा ते कल्हाट फाटा रस्ता चांगला व्हावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत सद्यस्थितीत 3.75 मीटर असलेला रस्ता 5.50 मीटर करुन रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी आमदारसाहेबांचे आभार मानले आहेत. प्रशस्त रस्ता झाल्यानंतर या भागातील दळणवळणास देखील अधिक गती मिळणार आहे. ( 1 crore 90 lakhs Fund for road construction in Andar Maval through MLA Sunil Shelke )
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, ह.भ.प. रोहिदास धनवे, मा.सरपंच विठ्ठल जाधव,बाबाजी गायकवाड, सरपंच कल्हाट शिवाजी करवंदे,उपसरपंच देवदास धनवे,सरपंच निगडे भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, सरपंच भोयरे अमोल भोईरकर, उपसरपंच ऋषिकेश भोईरकर, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, मोहन घोलप,संतोष करवंदे,मनोज करवंदे, तानाजी करवंदे, रवि पवार, भाऊसाहेब धनवे , बळिराम भोईरकर, किसान सेल अध्यक्ष दुंधाजी अगिवले, सोमनाथ अगिवले, मनिषा पवळे, रंजना पवार, धोंडिबा भागवत, किसन यादव, रामदास धनवे,संजय देशमुख, भागाजी यादव,शंकर कल्हाटकर आदि.मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– खासदार बारणेंनी घेतला लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा
– जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
– देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप