Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. १३ मे) रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कु. स्नेहल विठ्ठल शिंदे (९५.४० टक्के) हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर, कु. पल्लवी संतोष ढमाले (९४.६० टक्के) आणि कु. आर्या गणेश आहिरे (९३.२० टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सोबत शाळेतील आठ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थी आणि मुख्याध्यापक संजय वंजारे, दहावीचे वर्गशिक्षक संजय हुलावळे, संगीता खराडे, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, अन्य पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य संजय वंजारे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई