Dainik Maval News : मावळ परिसरात अंमली पदार्थांची विक्री काही प्रमाणात वाढलेली दिसत आहे. पोलीस पथक कारवाया करून अंमली पदार्थ विक्रेत्यांना ताब्यात असले तरीही पोलिसांच्या कारवाई पलिकडे लपून छपून अनेक तस्कर अंमली पदार्थ, गांजा विक्री आणि वाहतूक करीत आहेत. यामुळे अंमली पदार्थ विरोधी कारवाया वाढवून पोलिसांनी मुळापर्यंत शोध घेणे गरजेचे आहे.
गांजा विक्री प्रकरणी वृद्धास अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने शिवाजीनगर, देहूरोड येथे अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १३) सकाळी करण्यात आली. अंकुश कृष्णा साळवे (वय ७१, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील शिवाजीनगर येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून संशयित व्यक्ती अंकुश साळवे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ हजार ८०० रुपये किमतीचा १९६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत साळवे याला अटक केली आहे. त्याने हा गांजा निगडी येथील आकाश नावाच्या व्यक्तीकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
चाकण-तळेगाव रोडवर गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
चाकण-तळेगाव रोडवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ३४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली. गणेश अशोक भांडवलकर (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर देहूफाटा येथे एका पत्र्याच्या टपरीजवळ एकजण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गणेश याला अटक केली. त्याच्याकडून १७ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई