दैनिक मावळ (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वडगाव मावळ येथे शनिवारी (दि. ६ जून २०२६) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“रक्तदान श्रेष्ठदान – रक्तदान जीवनदान” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान श्रेष्ठदान – रक्तदान जीवनदान” रक्तदान महायज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाची पवित्र कार्य, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
एका रक्तदात्याने अनेकांना जीवनदान मिळू शकते. आपल्या रक्ताच्या एका थेंबातून एखादा गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे. हे शिबिर श्री दत्तमंदिर सभागृह (तळमजला), वडगाव (ता. मावळ, जि. पुणे) येथे सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.
सहभागी प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर थंड पाण्याचा जार व प्रशस्तिपत्रक भेट देण्यात येणार आहे. तसेच प्रथम ५० रक्तदात्यांना आकर्षक टी-शर्ट प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाचे आयोजन तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान, राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव समिती, मावळ विचार मंच, वडगाव शहर मराठी पत्रकार संघ, लायन्स क्लब ऑफ वडगाव, मावळ फेस्टिव्हल, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, व्यापारी संघटना, वडगाव पोलीस स्टेशन तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना