व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड परिसरात घडलेल्या केतन अगरवाल खून प्रकरणी शनिवारी (दि. ३१) वडगाव मावळ सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 2, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड परिसरात घडलेल्या केतन अगरवाल खून प्रकरणी शनिवारी (दि. ३१) वडगाव मावळ सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली. सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम उपस्थित होते. सर्व आरोपींची ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.

मुख्य आरोपी सिया गोयलच्या वतीने जामीन अर्ज आणि खटल्यातून दोषमुक्त करण्याबाबत दोन अर्ज दाखल झाले. सियाच्या विरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला. आरोपी चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांना येरवडा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दोन्ही अर्जाना विरोध केला. जोपर्यंत सरकारी पक्ष आपली बाजू आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गोळा केलेले पुरावे सादर करत नाही, तोपर्यंत जामीन अर्जावर विचार करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सुनावणीदरम्यान डिजिटल पुरावे (ई-साक्षी) आणि व्हिडिओच्या प्रती देण्यावरून वाद झाला. आरोपीच्या वकिलांनी बीएनएसएस कलम २०७ चा हवाला देत ई-साक्ष मागितली. यावर निकम म्हणाले की, टीव्हीवर बोलण्यापेक्षा आधी माहिती करून घ्या. ई-साक्ष तुम्हाला प्रक्रियेनुसार अपलोड करावी लागते. नवीन कायद्यानुसार ई-साक्ष अपलोड करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आधी त्याची पडताळणी करा.

निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारी पक्षाने तपासातील पुरावे आणि कागद‌पत्रांची माहिती दिली आहे. आता आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तिसरा आरोपी रितेश हांगे याच्याकडे वकील नसल्याने, त्याला वकील मिळेपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने निकम यांची मागणी मान्य केली.

पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. यावेळी सरकारी पक्ष खुनाच्या कटाबाबत आणि तिन्ही आरोपींविरुद्ध असलेल्या पुराव्यांबाबत युक्तिवाद करेल. त्याच दिवशी सिया गोयलच्या जामीन आणि डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होईल.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी सप्टेंबर २०२६ मध्ये ५,०५३ पानांचे आरोपपत्र दाखल केले. सुनावणीत मुख्य आरोपी सिया गोयलचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी जामीन आणि डिस्वार्ज अर्जावर युक्तिवाद केला. दुसरे वकील अॅड. विपुल दुशिंग हे सिया गोयलच्या कुटुंबाने नेमलेले वकील आहेत, असे सियाने कोर्टात सांगितले. आरोपी चेतन बाबुलाल चौधरीची अॅड. राम सहाणे यांनी बाजू मांडली. तिसरा आरोपी रितेश संजय हांगे यांच्याबाबत न्यायालयाने नमूद केले की, रितेश हांगे याच्याकडे अजून स्वतःचा वकील नाही. त्याला वकील नेमण्याची संधी द्यावी. नाहीतर न्यायालय त्याला सरकारी वकील उपलब्ध करून देईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे


dainik maval jahirat

Previous Post

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.