कामशेत, दि. २३ (प्रतिनिधी) : दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेळत असताना रस्ता चुकल्यामुळे तीन अल्पवयीन मुली व एक अल्पवयीन मुलगा, अशी ११ वर्षांपेक्षा कमी वयाची एकूण चार बालके हरवल्याची माहिती देण्यासाठी एक महिला कामशेत पोलीस स्टेशन येथे आली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश घनश्याम पवार यांनी तात्काळ विविध पोलीस पथके तयार करून कामशेत, लोणावळा, तळेगाव व इतर ठिकाणी रवाना केली. बालकांचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर चारही बालके देहूरोड येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ देहूरोड रेल्वे स्थानक गाठले. तेथून चारही बालकांना सुरक्षित ताब्यात घेऊन कामशेत पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.
या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, फिर्याद दाखल होण्यापूर्वीच अवघ्या तीन तासांच्या आत चारही हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. कामशेत पोलिसांनी दाखविलेली तत्परता, समन्वय आणि सीसीटीव्ही फुटेजच्या प्रभावी वापरामुळे ही कारवाई यशस्वी झाली.
कारवाईतील पोलीस अधिकारी व अंमलदार
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश घनश्याम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश महादेव पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय प्रभाकर शेडगे, पोलीस हवालदार आशिष विजयराव झगडे, पोलीस हवालदार दुर्गा मच्छिंद्र जाधव, पोलीस नाईक सचिन नागनाथ निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश शिवाजी मारकड, पोलीस कॉन्स्टेबल महेश मारुती थोरात, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक मारुती काळे व पोलीस कॉन्स्टेबल अमित अरुण पाडळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

