Dainik Maval News : लोणावळा जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉईंटवर दरीत पडून एका महिला व लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना आज घडली. मात्र, स्थानिक दुकानदार आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे व तातडीच्या मदतीमुळे या दोघींचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
सोमवारी (19 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजता ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ला एक फोन आला, ज्यामध्ये टायगर पॉईंटवरून एक महिला आणि लहान मुलगी दरीत पडल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच टीमने तातडीने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि रुग्णवाहिकेला देखील पाचारण केले.
रेस्क्यू टीम रेस्क्यू साहित्याची जुळवाजुळव करत असतानाच दुसरा फोन आला, ज्यामध्ये दरीत पडलेल्या त्या दोघींचा वाचवा, वाचवा असा आवाज येत असल्याचे कळवण्यात आले. हे ऐकताच शिवदुर्गची टीम कुठलाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाली. रेस्क्यू टीम पोहोचण्यापूर्वीच, अगोदर निघलेली रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती. तसेच तिथल्या स्थानिक दुकानदारांनी व नागरिकांनी अत्यंत धाडस दाखवत दोरीच्या साहाय्याने खाली उतरून त्या दोघींना सुखरूप वर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना करण्यात आले. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा स्थानिक लोकांच्या सहकार्याने तोपर्यंत मोठे संकट टळले होते आणि दोघींचे प्राण वाचले होते.
सोनाली शिवराज गजभार (वय ३७ वर्षे) व मनाली शिवराज गजभार (वय १२ वर्षे) असे या दरीत पडलेल्या माय लेकींची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे सागर कुंभार, सागर दळवी, कपिल दळवी, सिद्धेश कुटे, अनिकेत घरदाळे, अनिकेत आंबेकर, आयुष वर्तक, करण वरे, योगेश उंबरे, आदिती गायकवाड, गणेश भांगरे, प्रणय अंबुरे, समर्थ गंभीर, महादेव भवर, पिंटू मानकर, प्रभाकर भालेराव, मनोहर ढाकोळ आणि सुनील गायकवाड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांचे धाडस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमची तत्परता यामुळे या भीषण अपघातात दोघींचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!
– वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त
– घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू
– दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक
