व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

वडगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्त अवस्थेत आढळलेल्या महाराष्ट्राच्या राज्यप्राणी शेकरूला जीवदान देण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 13, 2026
in लोकल, ग्रामीण
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्त अवस्थेत आढळलेल्या महाराष्ट्राच्या राज्यप्राणी शेकरूला जीवदान देण्यात आले. एका दक्ष नागरिकाने तत्परता दाखवत या शेकरूला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या समन्वयातून त्याची तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल पालोडकर आणि वनरक्षक माहोरे यांच्या देखरेखीखाली शेकरूची प्राथमिक तपासणी करण्यात आली. शेकरू पूर्णपणे निरोगी आणि नैसर्गिक अधिवासात राहण्यास सक्षम असल्याची खात्री झाल्यानंतर वनरक्षक माहोरे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले.

या बचाव आणि पुनर्मुक्ती मोहिमेदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनरक्षक माहोरे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंध्रे, तसेच वन्यजीव अभ्यासक जिगर सोलंकी आणि मयूर चौधरी उपस्थित होते. दक्ष नागरिक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि वडगाव वनविभाग यांच्यातील समन्वयामुळे राज्यप्राण्याला वेळेवर मदत मिळाली.

शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी
इंडियन जायंट स्क्विरल अर्थात शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून, तो पूर्णपणे वृक्षवासी प्राणी आहे. पश्चिम घाट, मध्य भारत आणि पूर्व घाटातील सदाहरित तसेच दमट पानगळीच्या घनदाट जंगलांमध्ये तो प्रामुख्याने आढळतो. झाडांच्या उंच शेंड्यांवर वावरणारा हा लाजाळू आणि चपळ प्राणी फळे, बिया, झाडांची साल आणि फुले यांवर उपजीविका करतो. जंगलातील बीजप्रसारातही त्याची महत्त्वाची भूमिका असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब उड्या मारण्यात पटाईत असलेल्या शेकरूच्या संरक्षणासाठी भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ मधील अनुसूची एकअंतर्गत सर्वोच्च कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची शिकार किंवा तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली


dainik maval jahirat

Previous Post

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.