वडगाव मावळ, दि. ९ (प्रतिनिधी) – वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि अनावश्यक खर्च न करता, तो दिवस काहीएक समाजपयोगी विधायक उपक्रम राबवून देखील साजरा करता येतो. याचे उत्तम उदाहरण वडगाव नगरपंचायतीचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.
मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सुनील ढोरे यांचा वाढदिवस होता. या दिवशी त्यांनी वाढदिवसाचा सर्व खर्च टाळून, कुठलाही कार्यक्रम न घेता जवळपास १६ लाख ५० हजार रुपये खर्चून “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथ” याचे लोकार्पण केले आहे. वाढदिवसाच्या दिवशी एक समाजपयोगी उपक्रम आणि आपल्या लाडक्या नेत्याला अर्थात स्वर्गीय अजितदादा पवार यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुनील ढोरे यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवारी तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा तालुकास्तरीय पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ह्या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुनील शेळके, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दीपक हुलावळे, लाला गोणते, राज खांडभोर यांसह वडगावचे नगरसेवक गणेश म्हाळसकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ बंटी वाघवले, सोमनाथ धोंगडे आदीजण उपस्थित होते.
वैकुंठ रथाच्या उपक्रमाचे वडगाव शहर आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी स्वागत केले आहे. अंत्यविधीच्या वेळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईकांना अनेकदा मृतदेहाचे वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होत नाही. मृतदेह नेण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन सुनील ढोरे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून स्वखर्चाने “वैकुंठ रथ” हा समाजोपयोगी उपक्रम राबविला. त्यांचा हा उपक्रम सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

