Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथे पतीने स्वतःच्या पत्नीची दगड आणि विटांनी अमानुष मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘काळी दगडू वाघमारे’ (वय ४०) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून, या हत्याकांडानंतर पसार झालेल्या आरोपी पतीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत लोणावळा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसगाव बुद्रुक येथील कारके वस्तीमध्ये ही घटना सोमवारी (२१ सप्टेंबर) दुपारी १ ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी दगडू रामू वाघमारे (वय ४५) आणि त्याची पत्नी काळी वाघमारे यांच्यात अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे भीषण हिंसेत झाले. संतापलेल्या दगडूने पत्नीच्या डोक्यात दगड आणि विटा मारून तिला जागीच ठार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर फरार पतीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथकं तयार केली. तपासादरम्यान आरोपी दगडू वाघमारे हा रेल्वेने थेट कर्नाटकच्या दिशेने पळून जाण्याचा बेतात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप


