व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

डोळ्यांसमोर बैल तडफडताना पाहून शेतकऱ्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यालाही विजेचा सौम्य धक्का बसला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील दुर्गम मोरवे गावात रानात चरत असलेल्या बैलांना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) दुपारी विद्युत वाहिनीचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शेतातून गेलेली खासगी क्षेत्राकडील चालू विद्युत वाहिनी अचानक खाली कोसळल्याने तिच्या संपर्कात आलेल्या दोन बैलांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बैलांचा हंबरडा ऐकून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या शेतकऱ्यालाही विजेचा धक्का बसला; मात्र हातात काठी असल्याने तो थोडक्यात बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरवे परिसरात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास येथील शेतकरी काशिनाथ एकनाथ घारे (वय ६६) त्यांचे बैल चरण्यासाठी रानावर घेऊन गेले होते. ज्या शेतात बैल चरत होते, त्या ठिकाणाहून एका धनाढ्य व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर खासगी विद्युत वाहिनी गेली होती. ही चालू विद्युत वाहिनी अचानक खाली कोसळली आणि चरत असलेल्या दोन बैलांच्या संपर्कात आली. काही क्षणांतच दोन्ही बैलांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

बैलांचा हंबरडा ऐकून शेतकरी घाबरून घटनास्थळी धावला. आपल्या डोळ्यांसमोर बैल तडफडताना पाहून त्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यालाही विजेचा सौम्य धक्का बसला. सुदैवाने त्याच्या हातात काठी असल्याने शेतकरी विद्युत प्रवाहाच्या थेट संपर्कात येण्यापासून बचावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असलेले दोन्ही बैल या घटनेत दगावल्याने त्याचे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने ही केवळ आर्थिक हानी नसून शेतीच्या कामासाठी आधार असलेल्या जनावरांचा झालेला मृत्यू हा मोठा भावनिक धक्का आहे.

या घटनेनंतर संबंधित विद्युत वाहिनीची सुरक्षितता, देखभाल आणि ती शेतातून नेण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. चालू विद्युत वाहिनी अशा प्रकारे शेतात कोसळून दोन जनावरांचा जीव जाणे ही बाब गंभीर असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

या घटनेचा संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित धनाढ्य व्यक्तीविरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप


dainik maval jahirat

Previous Post

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

Next Post

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

"सेवा संकल्प अभियान २०२६" चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.