व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

विशेष ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, विसर्जन घाट स्वच्छता व जनजागृती उपक्रमांचे आयोजन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 27, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, विसर्जन घाट स्वच्छता तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे.

  • अभियानाच्या अनुषंगाने दि. १७ सप्टेंबर रोजी मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ विशेष ग्रामसभेच्या आयोजनातून करण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून गावातील विविध घटकांचा सहभाग वाढवून उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

इंदोरी येथील विशेष ग्रामसभेस ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करून अभियानातील उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

स्वच्छता उपक्रमांना प्राधान्य
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणे, गावातील परिसर तसेच विविध धार्मिक व सामाजिक स्थळांची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत गणपती विसर्जन घाटाची स्वच्छता करण्यात आली. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, निर्माल्य व इतर साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बेलसर-माळशिरस परिसरातही ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्त ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. गराडे तसेच इतर गावांमध्येही अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विठ्ठल माध्यमिक विद्यालय, मानाप्पावस्ती येथेही अभियानाशी संबंधित जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले.

लोकसहभागातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय उपक्रमांची माहिती पोहोचविण्यासोबतच स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभागाला चालना देण्यात येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून अभियानातील उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक गरजेनुसार विविध उपक्रमांचे नियोजन करून त्यामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप


dainik maval jahirat

Previous Post

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

Next Post

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.