व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांना मंगळवारी (दि. १५) मावळवासीयांनी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 16, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला तब्बल अनेक दशके दिशा देणारे, असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि ‘तालुक्याचे भाग्यविधाते’ अशी गौरवमुद्रा लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांना मंगळवारी (दि. १५) मावळवासीयांनी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, कला, क्रीडा, उद्योग, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह बाफना साहेबांना मानणारा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्याने केवळ ज्येष्ठ राजकीय नेत्यालाच नव्हे, तर एक मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ गमावल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

माजी मंत्री मदन बाफना (वय ८६) यांचे सोमवार, १४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्राच्या उभारणीत त्यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली.

मंगळवारी सकाळी मदन बाफना यांचे पार्थिव बाणेर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उल्हास पवार आणि अंकुश काकडे यांनी अंत्यदर्शन घेऊन बाफना कुटुंबीयांचे सांत्वन केले.

त्यानंतर सकाळी ११ वाजता वडगाव मावळ येथील संत तुकाराम प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मावळ तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले.

दुपारी ४.३० वाजता वडगाव येथील स्मशानभूमीत मदन बाफना यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांनी मानवंदना देऊन माजी मंत्र्यांना अखेरचा शासकीय निरोप दिला.

अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे,माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार देविदास भन्साळी,माजी आमदार विलास लांडे,बबनराव भेगडे, माऊली दाभाडे, बाळासाहेब नेवाळे,विठ्ठल शिंदे,रामदास काकडे,बापूसाहेब भेगडे, हभप बाळासाहेब काशीद,चंद्रकांत शेटे,बाबुराव वायकर,गणेश आप्पा ढोरे,गणेश खांडगे,यशवंत मोहोळ,दिलीप ढमाले, सुभाषराव जाधव,रवींद्र भेगडे,सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे,दत्तात्रय पडवळ, आदींसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी मदन बाफना यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतील योगदानाचा गौरव केला. मावळच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय वाटचालीत त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मावळच्या सार्वजनिक जीवनात अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारे मदन बाफना यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर हीच त्यांच्या कार्याची आणि मावळवासीयांच्या मनातील त्यांच्या स्थानाची जणू भावपूर्ण साक्ष ठरली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास


dainik maval jahirat

Previous Post

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

Next Post

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.