Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली, वाहनांच्या काचांना ब्लॅक फिल्म लावणे, हेल्मेट न वापरणे तसेच चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर न करणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये एकूण रु. ५४,५००/- इतका दंड करण्यात आला.
वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्त्यावरील शिस्त राखणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे तसेच वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.
सदरची कामगिरी गजानन टोणपे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक भूषण माने, WAPI विजया मेत्रे, पोलीस हवालदार भूषण कदम (ब.नं. १३७४), पोलीस हवालदार विनोद गवळी बक्क नंबर 2277, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे,पोलीस कॉन्स्टेबल यश देसाई,पोलीस मित्र अनिल लोंढे, विनोद विकारी, विक्रम येवले व वाजे यांनी केली.
लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकी चालविताना हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा. वाहनांमध्ये अनधिकृत ब्लॅक फिल्मचा वापर करू नये तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर टाळावा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे


