Dainik Maval News : पवनानगर परिसरामध्ये गणरायाचे मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये सोमवारी (दि.१४) स्वागत करण्यात आले होते. ग्रामीण भागामध्ये गावातील बऱ्याच घरांमध्ये गणरायाची भक्ती व सेवा करता यावी, म्हणून दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. रविवारी (दि. १५ सप्टेंबर) अनेक गावांमध्ये या दीड दिवसाच्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला.
शिवली, ठाकुरसाई, काले, पवनानगर, ब्राम्हणोली आदी गावांतील नागरिकांनी पवना धरणाच्या, पवना नदीच्या काठावर वाजत गाजत नेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोथुर्णे, येळसे, शिवली या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या तीरावर विसर्जन केले. यामध्ये लहान मुलांसह तरूण व मोठ्या नागरिकांना मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
परिसरातील अनेक गांवामध्ये ढोल लेझीम पथके आहेत. या ढोलांना पुणे मुंबई, ठाणे, कल्याण या भागातुन गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या ढोलामध्ये गावातील अनेक तरूण सहभागी असतात. त्यामुळे मिरवणुकीत तरूणांची संख्या कमी जाणवत होती.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास
