व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत 'रास्ता रोको'

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 17, 2026
in लोकल, शहर
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात रुपेश वाघमारे या १६ वर्षीय आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त आदिवासी महिला आणि युवकांनी घटनास्थळी ठिय्या देत रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अपघाताचा घटनाक्रम दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या घटनाक्रमानुसार, रुपेश वाघमारे हा आपल्या होंडा डिओ दुचाकीवरून जात असताना त्याच्या पुढे चाललेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रुपेशची दुचाकी त्या वाहनाच्या मागील बाजूस धडकली. या धडकेनंतर रुपेश रस्त्याच्या उजव्या बाजूला पडला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या डेला रिसॉर्टच्या पाण्याच्या टँकरच्या मागील चाकाखाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याचा आरोप करत संतप्त आदिवासी महिला आणि युवकांनी संबंधित मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. डेला रिसॉर्ट प्रशासनाने या अपघाताची जबाबदारी स्वीकारून मृत रुपेशच्या कुटुंबीयांना मदत करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संतप्त आंदोलकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. डेला रिसॉर्ट प्रशासनाने मृत मुलाच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

अल्पवयीन रुपेशच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. अपघाताची नेमकी कारणे आणि संबंधितांची जबाबदारी याबाबत पोलिसांच्या तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!
– वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त
– घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू
– दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.