व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम..

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2026
in लोकल, शहर
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : घोरवाडी स्टेशनजवळील श्री मरिमाता मंदिर येथे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन आणि भरघोस बक्षिसांची मेजवानी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला निवेदक व सिनेअभिनेता अविनाश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गायिका अमृता झा यांच्या सुरेल गायनामुळे कार्यक्रमात संगीताची रंगतही वाढणार आहे. महिलांना मनोरंजनाची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि कोजागिरी पौर्णिमेचा आनंद एकत्रितपणे साजरा करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

खेळ रंगला पैठणीचा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला मानाची पैठणी, सोन्याची नथ आणि चांदीचे पान देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी मानाची पैठणी, चांदीचा छल्ला व चांदीचे पान, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला मानाची पैठणी, चांदीचे पैंजण आणि चांदीचे पान देण्यात येणार आहे.

याशिवाय लकी ड्रॉमधून फ्रिज, टीव्ही, सायकल, गॅस शेगडी, कूलर, फॅन, मिक्सर, सीलिंग फॅन, प्रेशर कुकर, डिनर सेट, इस्त्री, घड्याळ, नॉनस्टिक तवा आणि मेकअप बॉक्स अशी विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपस्थितांसाठी सुगंधी मसाला दुधाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
Demand to declare drought in Maval taluka and provide compensation of Rs 50000 per hectare to farmers

मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

October 23, 2026
Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.