Dainik Maval News : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन, व मराठ्यांच्या इतिहासात स्थान असलेल्या पवन मावळ विभागातील किल्ले तिकोना उर्फ वितंडगडावर वेताळ महाराज परिसरात ३० फुट उंच भगवा ध्वज उभारण्यात आला. नव्याने उभा करण्यात आलेल्या भगवा दुर्गध्वजारोहन सोहळ्याचे आयोजन विजयादशमी निमित्त करण्यात आले होते.
या भगवा ध्वज उभारणी करीता भिवरी, उरूळी कांचन येथील उद्योगपती दत्तात्रय गोते यांनी निधी उपलब्ध करून दिला. सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग व उपस्थित दुर्गसेवकांनी वेगवेगळ्या दोन दिवस तिकोनागडावर जात ३० फुट उंच जी.आय. प्रकारातील अवजड असा खांब पायथ्या पासुन गडावर आपल्या खांद्यावर वाहून नेऊन अहोरात्र एक करत भगवा ध्वजाचा खांब गडावर बसविला. या सर्वांचे प्रयत्नाने स्वाभिमान, अभिमान व स्वराज्याचे प्रतिक असलेला ३० फुट उंच भगवा ध्वज तिकोनागडावर उभा राहिला.
विजयादशमीच्या मुहुर्तावेळी भगवा दुर्गध्वजारोहन करण्यात आले. दुर्गपुजन, शस्त्रपुजन करून गड व गडदेवता यांना नैवद्य दाखवन्यात आलेसोहळ्यास उपस्थितीतांच्या आल्पोहाराची सोय वैभव गोसावी (रा. शिंदे वाडी) यांनी केली होती.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

