व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा सात जुलै रोजी श्री क्षेत्र देहूतून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2026
in शहर, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा सात जुलै रोजी श्री क्षेत्र देहूतून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे आदी उपस्थित होते. श्री. मोरे म्हणाले, ‘‘सात जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखी देहूतील इनामदारवाड्यात मुक्कामी असेल. ८ जुलै रोजी पालखीचा इनामदारवाड्यातून निघून आकुर्डीत मुक्काम असेल.

दिनांक ९ जुलै रोजी सोहळा पिंपरी, कासारवाडीमार्गे पुण्यात नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन दिवस मुक्कामी राहील. ११ जुलैला हडपसरमार्गे लोणीकाळभोर येथे कदमवाकवस्ती नवीन पालखी तळावर मुक्कामी जाईल. १२ जुलैला सोहळा यवत, १३ जुलैला वरवंड येथे, १४ जुलै रोजी सोहळा उंडवडी गवळ्याची येथे तर १५ जुलैला बारामतीत मुक्काम करेल. १६ जुलै रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असेल. काटेवाडी येथे मेंढ्याचे रिंगण होईल. १७ जुलै रोजी बेलवाडीत सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी निमगाव केतकीत मुक्काम करेल.

दिनांक १८ जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण करून मुक्काम करेल. १९ जुलै रोजी पालखी सराटी मुक्कामी असेल. २० जुलै रोजी सोहळा नीरा स्नानानंतर अकलूज येथे तिसरे गोल रिंगण होईल. २१ रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा बोरगाव मुक्कामी जाईल. २२ जुलैला दुपारी तोंडले बोंडले येथे धावा होईल. पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी राहणार आहे. २३ जुलैला वाखरीजवळील बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर वाखरीत मुक्काम असेल. २४ जुलै रोजी पादुका अभंग आरती, उभे रिंगण झाल्यानंतर सोहळा पंढरपुरातील संत तुकाराम महाराजांच्या नवीन मंदिरात मुक्कामी जाईल.

‘पालखी रथ नवीन करण्याचा मानस’
यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांची निवड संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी बुधवारी (दि. ३) जाहीर केली. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी रथ आणि चौघडा वाहनास जुंपण्यासाठी तीन बैलजोडींची खरेदी करणार आहे. तसेच नवीन चांदीचा रथाचे काम सुरू आहे, असेही पालखी सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.