व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

रेल्वे, रस्ते, पर्यटनाला चालना ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खासदारकीच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. रेल्वे, रस्त्यांची कामे मार्गी लावली. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध कामे केली. पाणीपुरवठा कामाला प्राधान्य दिले, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात यश आल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. लोकसभेत ९६ टक्के उपस्थित राहिलो असून चर्चेत सर्वाधिक सहभाग घेतला. पाचवेळा संसद रत्न, एकवेळा संसद महारत्न आणि दोनवेळा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित झालो असल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बारणे यांनी कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, १६, १७ व १८ व्या लोकसभेत २०१२ प्रश्न विचारलेले असून ५१३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. ३६ खासगी सदस्य विधेयके सादर केली. लोकसभेतील उपस्थिती ९६ टक्के आहे. ऊर्जाविषयक लोकसभा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून १२ अहवाल सादर केले. समितीच्या आतापर्यंत ३२ बैठका घेण्यात आल्या असून तीन अभ्यास दौरे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

  • १६ वी, १७ वी व १८ वी लोकसभेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल प्राईम पॉईंट फाऊंडेशन यांच्या वतीने विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. उत्कृष्ट संसदीय कार्याबद्दल पाचवेळा संसद रत्न पुरस्कार, एकवेळा संसद महारत्न आणि दोनवेळा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पिंपरी येथील पासपोर्ट सेवा केंद्राची एप्रिल २०१७ रोजी सुरवात केली. या केंद्रातून आजतागायत एक लाख ७१ हजार ८०७ नागरिकांनी पासपोर्ट काढले. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढले. चापेकर स्मारकासाठी राज्य सरकारकडून भरीव निधी आणला. देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल येथे पूर्णत्वास नेऊन त्याकामी पाठपुरावा केला. सतत पाठपुरावा करीत पिंपरी ते भक्ती शक्ती चौक, निगडी पर्यंत मेट्रोला मंजुरी घेतली. काम ५०% पूर्णत्वास आले असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हिंजवडी ,वाकड, पिंपळे सौदागर ,भोसरी ते चाकण नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष रखडलेला नवी मुंबई ते खारघर पनवेल या मार्गावरील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून मेट्रो सुरु केली. पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश केला.

1. पनवेल ते उरण रेल्वे मार्गाला गती देऊन गेली अनेक वर्षे रखडलेला रेल्वे मार्ग पूर्ण केला. या मार्गावर लोकल सेवा चालू केली. पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून लवकरच लोकल सेवा व रेल्वे सेवा चालु होईल.
2. पुणे-लोणावळा तिसऱ्या चौथ्या नवीन रेल्वे ट्रॅकच्या कामास केंद्र व राज्य सरकारची खर्चास मंजुरी मिळाली असून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. कोरोना काळात बंद केलेली लोकल सेवा पूर्ववत केली. पुणे -लोणावळा दुपारी दीडची लोकल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
3. पिंपरी-चिंचवडकरांसाठी सिंहगड एक्स्प्रेसला नव्याने डबा जोडण्यात आला. तळेगांव, शेलारवाडी, जांभुळ, कामशेत येथे नागरीकांच्या सोयीकरीता रेल्वे मार्गिकेच्या खालून भूयारी मार्ग तयार करण्यात आले. कान्हेफाटा, वडगांव, मळवली, लोणावळा या रेल्वेमार्गावर उड्डाणपूल आणि शेलू, पळसदरी, कर्जत, खांडेश्वर, नेरळ, तळोजा या रेल्वेमार्गावर पादचारी उड्डाणपूल मंजुरी घेतली आहे. काही ठिकाणी कामास प्रारंभ झाला आहे.
4. चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगांव, लोणावळा, नेरळ या रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरण व सुशोभिकरण करण्याच्या कामास अमृत भारत योजने अंतर्गत सुरूवात केली. तसेच पनवेल स्टेशनला या योजनेत घेऊन सुशोभिकरण व विस्तारीकरणास सुरुवात झाली आहे. हे स्टेशन ‘मॉडेल’ केले जाणार आहे.
5. पिंपरी व पनवेल रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोईसाठी सरकते जिने बसविले. चिंचवड, आकुर्डी व लोणावळा रेल्वे स्टेशनवर लिफ्ट बसवली. पिंपरी रेल्वेस्टेशनचे सीएसआर फंडातून आधुनिकीकरण करण्यात आले.

रस्ते विषयक
देहू ते पंढरपूर पालखी मार्गासाठी देहू ते देहूरोड चौक संरक्षण खात्याची जागा असल्याने पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संरक्षण खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्गावर सिंहगड कॉलेज ते खालापूर मिसिंग लिंकच्या नवीन मार्गाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून घाटातील ट्रॅफिक जाम समस्या सोडवण्यात आली. प्रवाशांची वेळ, इंधनाची बचत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पनवेल – उरण ते मुंबई समुद्र मार्गावर अटल सेतू हा देशातील पहिला २२.५ किलोमीटर लांबीचा समुद्र मार्गावरील पूल मावळ लोकसभा मतदारसंघात उभारला आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचत मोठ्या प्रमाणात झाली पनवेल ते उरण जे.एन.पी.टी. राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करून वाहतुकीची समस्या सोडवली . या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उडाणपूल उभारले.

देहूरोड वाय जंक्शन, किवळे ते वाकड दरम्यान उड्डाणपूल
तळेगाव ते चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (NH.548D) डीपीआरला मंजुरी घेऊन कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच कामाला सुरूवात होऊन वाहतूककोंडीची समस्या दूर होईल. राष्ट्रीय महामार्ग चारवरील देहूरोड बायपास ते चांदणी चौक या मार्गावर किवळे ते वाकड ८.५ कि.मी. उड्डाणपूल कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व्हिस रोड काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मुख्यमार्गावर काम चालू होईल. किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

कल्याण-मुरबाड-कर्जत-भीमाशंकर या मार्गाम केंद्र सरकारकडून मंजुरी घेतली असून काम चालू आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील कळंबोली सर्कल येथून पनवेल-तळोजाकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे एक्सप्रेस हायवे खालील कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण व रुंदीकरण केले असून काम प्रगतीपथावर आहे. कार्ला कामशेत या मुख्य रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यास एमएसआरडीसीची मान्यता घेतली आहे. कार्ला येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील इतर हक्काचे शिक्के काढले. एमआयडीसीकडून ८०५ हेकटर जमीन सोडवून शेतकऱ्यांना दिली.

पर्यटन विकास
एकवीरा देवी मंदिर परिसराला तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाचा दर्जा मिळवून दिला. मंदिर परिसर विकासकामांसाठी एमएसआरडीएच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर करून कामाला सुरवात झाली. पाय-या ,गाभारा ,संवर्धन ,परिसर सुशोभिकरणची कामे चालू आहेत. या ठिकाणी रोप-वेला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. माथेरान येथील बंद पडलेली ऐतिहासिक मिनी ट्रेन नव्याने सुरु केली. माथेरान नेरळ रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण केले. माथेरान येथील पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याचबरोबर पर्यटकांसाठी ई-रिक्षाची सुविधा चालू केली. उरण येथील घारापुरी एलिफंटा लेणीचा देशाच्या पर्यटन विकास क्षेत्रात समावेश केला. घारापुरी एलिफंटा बेटावर समुद्रा खालून वीज पोहचवली. त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर केली. कार्ला, भाजे, एलिफंटा लेणी तसेच रायगड, विसापूर, लोहगड, राजमाची, तुंग, तिकोना या किल्यांच्या संवर्धनासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी आणला, कामासाठी निविदा प्रक्रिया झाली असून कामे प्रगतीपथावर आहेत. लोहगड किल्ल्यांचा युनोस्कोच्या यादीत समावेश झाल्याने किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होईल.

पाणी व नदीसुधार
पिपंरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात साठलेला गाळ लोकसहभागातून व स्वखर्चाने सातत्याने आठ वर्ष काढला. आतापर्यंत एक लाख क्युबिक मीटर गाळ काढला. त्यामुळे पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प डीपीआर तयार करून सदर प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्यावतीने तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळवली.

लोकसभेत विविध विषयावर आवाज उठवला
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला. मराठा आरक्षण मुद्दा सर्वप्रथम लोकसभेत मांडला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे हा तारांकित प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. धनगर आरक्षणासाठी खाजगी विधेयक मांडले. लोकसभेत ३६ खासगी सदस्य विधेयके सादर केली. त्यामध्ये सौर ऊर्जा प्रोत्साहन विधेयक , नद्या (संरक्षण आणि प्रदूषण निवारण) विधेयक , वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक , शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्तीचे लष्करी प्रशिक्षण विधेयक , सक्तीचे मतदान विधेयक, औषधे (किंमत नियंत्रण) विधेयक , प्लॅस्टिक वस्तू प्रतिबंध विधेयक , मोटार वाहन (सुधारणा) विधेयक, मुंबई उच्च न्यायालय (पुणे येथे स्थायी खंडपीठाची स्थापना) विधेयक , पर्यटन विकास मंडळ विधेयक, शाळांमध्ये खेळांच्या माध्यमातून मुलांची अनिवार्य शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास विधेयक, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अनिवार्य लष्करी प्रशिक्षण विधेयकाचा समावेश आहे.

  • केंद्र सरकारच्या दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तुंगी, डोंगरपाडा या अतिशय दुर्गम आदिवासी भागात वीज पुरवठा केला. तसेच डोंगर फोडून रस्ता तयार केला. याच योजने अंतर्गत मावळ तालुक्यातील सटवाईवाडी, धनगरपठार, डोंगरवाडी या ठिकाणी वीज पोहचवली. त्याचबरोबर धनगरपठार, वडेश्वर या आदिवासी पाड्यांवर रस्त्याचे काम केले. उरण येथील मच्छीमारांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून करंजा मत्स्य बंदराची निर्मिती करून मच्छीमारांना बायोमॅट्रिक कार्ड मिळवून दिले. कासा खडकावर उच्चतम सौरदिवे व दिशादर्शक टॉवर लावले. तसेच शासनाकडून मच्छीमारांसाठी डिझेलचा कोठा वाढवून देण्यात आला.

पिंपरी येथील हिंदुस्थान एन्टीबायोटिक कंपनी पुननिर्मितीसाठी व कामगार वेतन, निवृत्ती वेतनासाठी केंद्र सरकारकडून ४९८ कोटीस मंजुरी मिळवली. खालापुर रसायणी येथील हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या कामगाराच्या वेतनासाठी व कंपनी पुनर्निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून ४८७ कोटी रुपये मंजूरी मिळवून कामगारांना दिलासा दिला. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघात टप्पा क्र.१ आणि २ मध्ये एकूण ५२ कि.मी. रस्त्यांना मंजुरी घेऊन कामे पूर्ण केली. खासदार निधीतील कामे १००% निधी वापरुन मार्गी लावली. यात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, संगणक, रूग्णवाहीका, स्मशानभुमी, निवारा शेड व सभामंडप, सांस्कृतिक भवन या सारखी समाजाभिमुख कामे मार्गी लावली.

पंतप्रधान सहाय्यता निधीतुन वैद्यकीय उपचारासाठी आतापर्यंत ३०३ रूग्णांना ५०६६८२६४ रूपये निधी मिळवून दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकराच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून शास्तीकर पूर्णतः माफ करून कायमचा रद्द केला. बोपखेल पुलासाठी जिल्हाधिकारी, संरक्षण मंत्री यांच्या सोबत बैठका घेऊन बोपखेल पुलाचा प्रश्न मार्गी लावला. संरक्षण खात्याशी निगडीत असलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री यांची भेट घेवून देहूरोड येथील रेड झोन, उरण येथील नेव्ही सेन्सीटीव्ह झोन, मावळ मधील मिसाईल प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीनीना योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पिंपरी मिलिटरी फॉर्म येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाची मंजुरी घेवून प्रत्यक्ष कामास सुरवात केली. पुलाचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. त्यामुळे येथील जनतेचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल.

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या पिंपरी-चिंचवड प्राधिकरण बाधित शेतकऱ्याऱ्यांना जमिनीचा १२.५% परतावा मिळावा या करिता पाठपुरावा केला. ५४ हेक्टर जमिनीचा परतावा मिळवून देण्यासाठी मदत केली. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील ३.५ लाख नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. मतदारसंघातील ७५० दिव्यांगांना केंद्र सरकारच्या दिव्यांग विभागाच्या वतीने कर्णबधिरांसाठी कानाची मशीन, अंध दिव्यांगासाठी काठी, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, स्मार्ट फोन, सायकल इ. साहित्यांचे वाटप केले. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड, मावळ या भागात ४,२९४ व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६०२ लाभार्थीना लाभ मिळाला. दिनदयाल योजने अंतर्गत १६३ लाभार्थी पात्र होऊन त्यांना लाभ मिळवुन दिला. तसेच दारिद्रयरेषे खालील १,१०६ लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.


dainik maval jahirat

Previous Post

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

Next Post

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.