Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पवनानगर केंद्रावर वेगवेगळ्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला असुन पवना विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी पूर्वा शशिकांत घरदाळे ही शाळेसह पवनानगर केंद्रातही प्रथम आली आहे.
पवना शिक्षण संकुलाच्या पवना विद्या मंदिर शाळेनी आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून यंदाही शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सोबत पवना शाळा ही परिसरातील ४० गावे आणि वाड्या वस्त्यांसाठीची मुख्य केंद्र शाळा म्हणून परिचित आहे. या शाळेत बालवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिले जाते त्यामुळे या शाळेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असते.
पवना विद्या मंदिर शाळेचा निकाल – १०० टक्के
प्रथम : कु. घरदाळे पूर्वा शशिकांत – ९२.२० टक्के
द्वितीय : कु. डोंगरे पायल जितेंद्र – ९०.२० टक्के
तृतीय : कु. सावंत वेदांतिका विवेक – ९० टक्के
यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालक व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे, वर्गशिक्षिका सुमन जाधव, वैशाली वराडे तसेच सर्व शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro