Dainik Maval News : भारतासह जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. सर्वांचा लाडका किंग कोहली याने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता भारताची रनमशीन विरोट कोहली याने देखील कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. विराटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे.
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच अभिमानाने पाहीन…
“१४ वर्ष झाले, जेव्हा मी पहिल्यांदा भारताची बॅगी ब्लू (टेस्ट कॅप) घातली होती. कसोटी प्रकारात माझा प्रवास असा असेल याचा मी विचार केला नव्हता. या प्रकाराने माझी परिक्षा घेतली, मला आकार दिला, मला शिकवलं. ज्याचा मला आयुष्यभर फायदा होईल.
कसोटीत न खेळणे हे खूप वैयक्तिक आहे. शांत परिश्रम, मोठे दिवस, आणि असे अनेक क्षण असतात जे कोणी पाहत नाही पण जे कायम लक्षात राहतात.
या फॉर्मेटपासून दूर जाण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी माझं सर्वस्व दिलं, आणि या खेळाने मला त्याच्या कितीतरी पटीने परत दिलं — अपेक्षेपेक्षा जास्त.
मी कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने या खेळापासून दूर जात आहे. या खेळासाठी, माझ्यासोबत मैदान शेअर करणाऱ्या प्रत्येकासाठी, आणि प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली. मी नेहमी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे अभिमानाने पाहीन.” -विराट कोहली
अशी पोस्ट विराटने चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
विराटची कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द
123- कसोटी सामने
9230- धावा
46.85- सरासरी
30- शतके
31- अर्धशतके
68- कर्णधार म्हणून कसोटी
40- कसोटी विजय (कर्णधार)
अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade