Dainik Maval News : वडगाव मावळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदी जेष्ठ संचालक राजेंद्र पांडुरंग वहिले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष सचिन ढोरे , संचालक राजाराम म्हाळसकर, बंडोपंत धर्माधिकारी, दिलीप वहिले, सुरेश भंडारी, संजय काकडे आदींच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वहिले यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
संस्थेच्या माध्यमातून वडगाव शहरात स्थापन झालेली श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल ही इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा प्रगतीकडे वाटचाल करत असताना जेष्ठ संचालकांचे विशेष योगदान आहे. त्यामुळे, सचिवपदी राजेंद्र वहिले यांची निवड करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade