Dainik Maval News : देहूरोड येथील आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळनू आले आहे. हिल टॉप परिसर तसेच बेस्टन क्रमांक १४ जवळ बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रथम बिबट्या दिसून आला. त्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास पुन्हा त्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापार्श्वभूमीवर आयुध निर्माणी फॅक्टरी देहूरोड परिसरातील रहिवाशांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
या संदर्भात निर्माणी प्रशासनाने वन विभाग यांना माहिती दिली असून पुढील उपाययोजनांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच सीडब्ल्यूमधून पाणी सोडण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी डीएससी जवानांची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती कार्यसमितीकडून देण्यात आली आहे.
नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि कोणालाही बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभाग अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती
