वडगाव मावळ येथील स्वर्गीय माजी सरपंच पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी घालून दिलेली आदर्श शिकवण आणि वारसा जपत स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान मार्फत आयोजित सामुदायिक विवाह सोहळा-2023 रविवार, 16 एप्रिल रोजी वडगाव इथे संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 11 जोडपी विवाहबद्ध झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वसामान्य कुटुंबातील नव वधू-वरांसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार बनला आहे. मागील दहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने यशस्वीरीत्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात आतापर्यंत 150 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदा सोहळ्याच्या दशकपूर्ती निमित्त गोर गरीब समाजातील व उच्चशिक्षित कुटुंबातील वधू वरांनी या मध्ये सहभाग नोंदवला. ( 11 couples got married in community wedding ceremony at Vadgaon Maval )
या विवाह सोहळ्यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना समाजभूषण पुरस्काराने आणि वडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते अतुल राऊत यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मदन बाफना, माऊली दाभाडे, ह.भ.प. मंगल महाराज जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सोहळा समितीचे या वर्षीचे अध्यक्ष पत्रकार गणेश विनोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या 11 श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
– शिळींब ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय! भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव साधेपणाने साजरा, मंदिर उभारणीसाठी करमणूकीचे कार्यक्रम रद्द