व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या 11 श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

ही माहिती समजल्यानंतर एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यांनी मृतांच्या वारसांना तत्काळ 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 17, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
maharashtra-bhushan-heatstroke

Photo Courtesy : Twitter


नवी मुंबईतील खारघर इथे रविवारी, दिनांक 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आप्पासाहेबांचे लाखो श्रीसदस्य अनुयायी कार्यक्रमाला आले होते. त्यातील काही अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समजल्यानंतर एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यांनी मृतांच्या वारसांना तत्काळ 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. ( Maharashtra Bhushan Award ceremony turns deadly 11 die over 600 suffer heatstroke in Kharghar navi mumbai )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज खारघर येथे आयोजित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना #महाराष्ट्र_भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यातील ११ जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले, ही अतिशय अनपेक्षितपणे घडलेली दुर्देवी आणि वेदनादायी घटना असून मृत…

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 16, 2023

‘आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती –

रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी 2023 रोजी खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. तथापि या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– ‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके
– लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान


Previous Post

शिळींब ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय! भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव साधेपणाने साजरा, मंदिर उभारणीसाठी करमणूकीचे कार्यक्रम रद्द

Next Post

टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
accident-biker-died

टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.