Dainik Maval News : परिसरात आता धुक्याची चादर पसरू लागली आहे. ही चिन्हे पावसाळा संपल्याची देखील आहेत. यंदा पुणे जिल्ह्यात मान्सून भरभरून बरसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पुणे जिल्ह्यात 122 टक्के अर्थात 1052 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 76 टक्के अर्थात 655 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
मान्सूनने यंदा वेळेत हजेरी लावल्याने जिल्ह्यात पेरण्याही वेळेवर झाल्या होत्या. जिल्ह्यात खरिपाखालील सरासरी लागवड क्षेत्र 1 लाख 95 हजार 710 हेक्टर असून, यंदा वेळेवर आलेल्या पावसामुळे हे क्षेत्र जवळपास दुप्पट झाले आहे. यंदा 3 लाख 90 हजार 227 हेक्टरवर खरिपाच्या पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात 917 मिलिमीटर पाऊस पडला आहे. वास्तविक या तीन महिन्यांमधील जिल्ह्याची सरासरी 705.1 मिलिमीटर इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात या तीन महिन्यांत सरासरीच्या 130 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मावळात 219 टक्के पावसाची नाेंद
यंदा सर्वाधिक 2587.3 मिलिमीटर अर्थात 219.1 टक्के पावसाची नोंद मावळ तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल भोर तालुक्यात 1779.5 मिलिमीटर अर्थात 180 टक्के पाऊस पडला आहे. आंबेगाव तालुक्यात 1094.7 मिलिमीटर अर्थात 158.5 टक्के पाऊस पडला आहे. तर सर्वांत कमी 487 मिलिमीटर अर्थात 104 टक्के पाऊस पुरंदर तालुक्यात झाला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान । Maval News
– कामशेत खिंडीत झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात एकाचा जागीच होरपळून मृत्यू – पाहा Video
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप