आज (रविवार) 28 मे अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. ( Savarkar Jayanti 2023 ) सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून दिले होते. यंदा वीर सावरकरांची 140 वी जयंती आहे.
सावरकरांनी आपल्या साहित्यातून, लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे आणि देशाबाबतचे विचार वेळोवेळी प्रतिपादित केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमीत्त अनेक ठिकाणी व्याख्यान आणि उपक्रम असतात. तळेगावमध्येही शहर भाजपाकडून वीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोट्यवधी भारतीयांचे प्रेरणास्थान असणारे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंती दिनी भाजप कार्यालय, तळेगाव दाभाडे शहर इथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कऱण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सरचिटणीस वि. वा. गुंजाळ, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक, प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक, उपाध्यक्ष सुधीर खांबेटे हे उपस्थित होते. ( 140th birth anniversary of freedom fighter veer savarkar celebrated in talegaon dabhade )
अधिक वाचा –
– धक्कादायक! आंदरमावळात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू, गरीब शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन, वाचा लोकार्पण सोहळ्यातील सर्व घडामोडी