राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात पुणे जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. तर, मावळ तालुक्यातील 15 हजार 236 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला. तसेच विमा संरक्षित क्षेत्र 7 हजार 284 हेक्टर आहे, असे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. ( 15 thousand farmers took out crop insurance in 1 rupee In Maval Taluka )
मावळ तालुक्यात आतापर्यंत सर्वात जास्त पीक विमा महागाव ग्रामपंचायतीत 592, नवलाख उंब्रे 498 व निगडे इथे 394 शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण 39 हजार 973 शेतकऱ्यांनी विमा काढला. तर सर्वात कमी दौंड तालुक्यातील 5 हजार 87 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.
विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकेल. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची हप्ता भरण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2023 होती. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 20 हजार 330 पीक विमा संरक्षित क्षेत्र ग्राह्य धरले आहे. ( 15 thousand farmers took out crop insurance in 1 rupee In Maval Taluka )
मावळ तालुक्यात कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली. गावागावात कॅम्प, सभा, व्हाट्सअप ग्रुपद्वारे, वृत्तपत्र, शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज करून पीक विम्याबाबत जागृती केली. त्यामुळे हे यश आल्याचे शिळींब येथील कृषी सहायक विकास गोसावी यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा