व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना

देशातील राजकारणातील एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 7, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Rahul-Gandhi

File Image - Rahul Gandhi


देशातील राजकारणातील एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची रद्द करण्यात आलेली खासदारकरी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने तशी अधिसुचना काढली आहे. ‘मोदी आडनाव प्रकरणी‘ राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. ( Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court Decision )

Novel NIBR Ads

परंतू, दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे आता लोकसभा सचिवालयाने एक अधिसुचना जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा एकदा बहाल करत असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. राहुल गांधी हे केरळ राज्यातील वायनाड येथून लोकसभेचे खासदार बनले आहेत. ( Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court Decision )

नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत ❤️ pic.twitter.com/HWKn3pG53l

— Congress (@INCIndia) August 7, 2023

सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…

मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच सूरत कोर्टाच्या या निकालानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्य पदही गेले होते. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे त्यांना पुढची किमान सहा वर्ष निवडणुक लढवता येणार नव्हती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली. मात्र ती फेटाळून लावण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्या प्रकरणावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये 15 हजार शेतकऱ्यांनी काढला 1 रुपयात पीकविमा; तालुक्यातील 7 हजार 284 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Next Post

काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Praniti-Shinde

काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.