Dainik Maval News : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान पादचारी भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे पुणे–लोणावळा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून, काही उपनगरी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हे काम अत्यंत आवश्यक आहे.
पुणे–लोणावळा विभागातील देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान आरएच गर्डर पद्धतीने आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसविण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११:४० ते दुपारी ०३:४० वाजेपर्यंत अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवर चार तासांचा ट्रॅक ब्लॉक घेतला जाणार आहे.
बदलेले वेळापत्रक आणि रेल्वे सेवांचा तपशील:
– उपनगरी लोकल गाड्या रद्द
– रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे–लोणावळा मार्गावरील खालील चार लोकल गाड्या पूर्णपणे रद्द राहतील
– गाडी क्र. ९९८१४: पुणे ते लोणावळा लोकल
– गाडी क्र. ९९८१८: पुणे ते लोणावळा लोकल
– गाडी क्र. ९९८१३: लोणावळा ते पुणे लोकल
– गाडी क्र. ९९८१७: लोणावळा ते शिवाजीनगर (SVJR) लोकल
गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई सेंट्रल ते मुंबई एलटीटी एक्सप्रेस शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी सोलापूर किंवा पुणे विभागात ३ तास ३० मिनिटे नियंत्रित केली जाईल.
- गाडी क्र. ११०२९ सीएसएमटी मुंबई ते कोल्हापूर एक्सप्रेस रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ०८:४० वाजता सुटणारी ही गाडी ३ तास ३० मिनिटे उशिराने म्हणजेच दुपारी १२:१० वाजता सुटेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे. यासाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मोबाईलमधील NTES (National Train Enquiry System) ॲपचा वापर करावा.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे



