व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

बाळा भेगडे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मावळ तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून करण्याबाबत पत्र पाठवले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 27, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात असलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता मावळ तालुक्याचा समावेश देखील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून व्हावा, या मागणीसाठी मावळ मधील विविध संघटना, शेतकरी यांच्याकडून प्रशासनाला पत्र व्यवहार करण्यात आला होता. मावळचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनीही थेट मंत्रालय स्तरावर याबाबत पत्र व्यवहार केला होता.

बाळा भेगडे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मावळ तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून करण्याबाबत पत्र पाठवले होते. यात मावळ मधील सद्यस्थिती ही राज्यातील इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांसारखे अत्यंत चिंताजनक दुष्काळजन्य असल्याचे लिहिले होते.

दरम्यान, मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप समितीचे बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात यापूर्वी 304 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला असून आणखीन काही भागांचा समावेश करण्याची मागणी प्राप्त झाली आहे, त्या ठिकाणी क्षेत्रीय पाहणी करून अंतिम अहवाल झाल्यानंतर त्या तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले होते. त्यानुसार मावळ तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुका यादी समाविष्ट करण्यासाठी आता शासकीय समितीद्वारे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तसेच मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ उप समितीच्या बैठकीत मावळच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे दिसत आहे. शासकीय समितीच्या भेटीनंतर अहवालास मंजुरी मिळाल्यास लवकरच मावळचाही समावेश दुष्काळी तालुक्यात होईल व मावळला दुष्काळ निवारणासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा लाभ येथील शेतकऱ्यांना घेता येईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.