Dainik Maval News : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज (दि. 27) मावळ भाजपाचे नेते रवींद्र भेगडे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पवना धरणग्रस्त शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
या बैठकीची वेळ पुढील आठवड्यात कळविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली आहे. आगामी बैठकीत पवना धरणग्रस्त शेतकरी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

