Dainik Maval News : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता फुलावी आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कै. चित्रकार सूर्यकांत काका वाळुंज स्मृती तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. मावळ तालुक्यातील तब्बल ४६ शाळांमधील सात हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या वेळी विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तर कला शिक्षकांना ‘कलारत्न पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
सूर्यकांत काका वाळुंज युवा मंच, तळेगाव दाभाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ आणि मराठी पत्रकार संघ, मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, कलापिनीचे अध्यक्ष डॉ. अनंत परांजपे, प्रभावती वाळुंज, गटनेते दिलीप ढोरे, नगरसेवक सागर बोडके, नगरसेविका संगीता खळदे, पंचायत समिती सदस्या रेश्मा देवकर, पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, राजू देवकर, मंदा वाळुंज, जयसिंग वाळुंज, धनंजय नांगरे, रियाज तांबोळी, देवराम पारीठे, अशोक कराड, राजेंद्र भांड, बाळासाहेब पाचारणे, राजकुमार वरघडे, संपत गोडे, संजय कसाबी, अमोल जाधव, योगेश पाटील, विजय वरघडे, सोपान असवले, सुनिल मंडलिक, लक्ष्मण मखर, विलास भेगडे, सुभाष वाणी, विशाल वाळुंज, संजय हुलावळे, राहुल सोनवणे, जितेंद्र पवार, काकासाहेब काळे, गणेश विनोदे, विशाल कुंभार, श्रीहरी तनपुरे आणि सतीश गाडे उपस्थित होते. यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वाळुंज परिवारातील आप्तेष्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, डॉ. अनंत परांजपे, पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर, माध्यमिक शिक्षक सोमनाथ गोडसे आणि प्राथमिक शिक्षिका सुरेखा राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. कै. सूर्यकांत काका वाळुंज यांच्या चित्रकलेतील योगदानाचे स्मरण करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राम कदमबांडे यांनी केले. भारत काळे आणि दिलीप पोटे यांनी सूत्रसंचालन केले, तर गौरी पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीहरी तनपुरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून कै. सूर्यकांत वाळुंज यांचे रेखाटलेले छायाचित्र. या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत अशा स्पर्धांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच चित्रकलेच्या क्षेत्रात नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य या उपक्रमातून अधोरेखित झाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

