पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे एसटी आगारातून आषाढी एकादशी निमित्त 19 अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून जर प्रवाश्यांची संख्या 40 असेल तर त्या गावातून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी बस सोडण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तळेगाव आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आषाढी वारी निमित्त मावळ तालुक्यातून हजारो वारकरी सामील होऊन पायी वारी करत आहेत. परंतू ज्यांना वारीला जाता येत नाही मात्र श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाण्याची इच्छा आहे. अशा भाविकांसाठी तळेगाव दाभाडे आगारातून विशेष बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सद्या या आगारातून दररोज दोन बस गाड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात आहेत.
महिला सन्मान योजने अंतर्गत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच महिलांना 50 टक्के सवलत, तर 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच 75 वर्षावरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत मोफत प्रवास मिळेल. या तीनही योजनेच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशांकडे आधार कार्ड बरोबर असणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्रमोद धायतोंडे यांनी दिली.
पंढरपूर यात्रेच्या काळात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीमती मीना पोटे, वाहतूक निरीक्षक आकाश जगताप, वाहतूक नियंत्रक प्रमोद नखाते, अमित साळवे यांनी केले आहे. ( 19 additional buses from Maval Taluka Talegaon ST Agar to Pandharpur )
अधिक वाचा –
– अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर
– बापरे बाप ! कार्ला फाटा येथे तब्बल 48 किलो गांजा जप्त, तिघांना अटक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime News
– तळेगावात अपघात ! भरधाव कारने 7 वर्षीय चिमुकल्याला उडवले । Talegaon Dabhade