Dainik Maval News : भारतातील स्थानिक विक्रेता आणि इंग्लंड मधील कंपनी यांच्यामध्ये मध्यस्थी करून चांगला नफा मिळविण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची 19 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 मार्च ते 11 सप्टेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार ailsajenson@aol.com मेल आयडी धारक व 447466640625 क्रमांकावरून व्हॉट्स अप वापरणारी महिला एलिसा जेन्सन, मोबाईल क्रमांक 7900141856/9833486694 व sales@kumarmfgenterprises.com मेल आयडी वापरणारा विजय रेड्डी, 1(403)6684839 आणि info.bhr.co.uk@consultant.com वापरणारा डॉ. ब्रयन एनव्हर्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना वेळोवेळी संपर्क केला. युकेमधील कंपनीसाठी लागणारे टॅनोल्डिन कच्चे तेल भारतामध्ये मिळत आहे. युकेमधील कंपनी व भारतातील विक्रेता यांच्यात फिर्यादी यांना मध्यस्थ म्हणून काम केल्यास 60 टक्के प्रॉफिट देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यानंतर विजय रेड्डी यांच्याकडून 25 लिटर ऑइल खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 19 लाख 10 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर पुढील व्यवहार न करता त्यांची फसवणूक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade