मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील दुर्गम खेडे असलेल्या मोरवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (3 जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला आणि क्रांतीज्योत पेटवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक शरद शिंदे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिषा घारे, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे, सुवर्णा निपाणे, वैशाली घारे, रजनी शिंदे, भागिरथी शिंदे, रेखा शेळके, सुरेखा वांजळे सुनंदा घारे आदी महिला यावेळी इत्यादी उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गोड खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक वाचा –
– संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे बालिका दिन अत्यंत उत्साहात साजरा । Savitribai Phule Jayanti
– मोठी बातमी! संप काळातही वीजपुरवठा सुरळीत राहणार, पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा, जाणून घ्या
– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम