महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (1 मे) वडगाव नगरपंचायत आवारात लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील स्वच्छता राखण्यासंदर्भात सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आतंरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023
– मोरवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त स्वच्छता मोहिम