Dainik Maval News : एलआयसी च्या नव्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करा असे सांगत एका व्यक्तीची 2 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार तळेगाव दाभाडे (talegaon dabhade) येथे घडला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलआयसी ऑफिस मधून बोलत असल्याचे सांगून फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी महिलेने एका व्यक्तीला एलआयसी एजंट म्हणून घरी पाठवले. त्या एजंटने व्यक्तीला गुंतवणूक करण्यास सांगत त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना ९ नोव्हेंबर २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.
- याप्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि. ११) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिला, एलआयसी एजंट बनून आलेला दीपक जाधव (वय ३५) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीस फोन करून ती एलआयसी ऑफिस शिवाजीनगर पुणे येथून बोलत असल्याचे सांगितले. एलआयसीने एलआयसी एनबीएफसी इन्फ्रा बॉण्ड या नावाने नवीन गुंतवणूक प्लॅन सुरु केला आहे. याबाबत आमचे एजंट तुमच्या घरी येऊन प्लॅन बाबत सविस्तर माहिती देतील, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या घरी आरोप दीपक जाधव आला. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना संबंधित प्लॅन मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यासाठी फिर्यादी कडून ओरपीने दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी केलेली गुंतवणूक पाहण्यासाठी एक फेक लिंक पाठवून त्यांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ