आढले खुर्द गावातील एका घरातून एक दोन नव्हे तब्बल 20 घोणस सापांच्या पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी आणि झाकीर शेख यांनी जीवदान दिले आहे.
आढले गावात तेजस रामदास भालेसेन यांच्या घराच्या आवरात बाथरुमजवळ त्यांच्या आईना काही सापांची पिल्लं दिसली. त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला संपर्क साधला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी व झाकीर शेख त्या जागी पोहचले. त्यांनी 2 तासात घोणस जातीचे 20 पिल्लं आणि मादी सुखरूप रेस्क्यू केले. ( 20 Ghonas snake cubs have been found in Adhale village of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याबाबत त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वडगांव मावळ हनुमंत जाधव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती दिली. तसेच त्यांच्या सूचनेनुसार घोणस या सापांची पिल्ले आणि मादी जंगलात सोडून दिले. रुपाली भालेसेन आणि संपत भालेसेन यांनी याबाबत संस्थेचे आभार मानले.
विषारी सापांपैकी एक घोणस….
घोणस हा मावळ भागातला एक विषारी साप आहे. हा साप अंडी घालत नाही. जुन महिन्यात घोणस सापाची मादी पिल्लं जन्माला घालतात. 15 ते 70 पिल्लं एका वेळीस जन्माला घालू शकते. मागच्या वर्षी पन 17/06/2022 जुन महिन्यातच 25 पिल्लं व मादी तळेगांव मधून रेसॅकू केले होते. घोणस साप चीडल्यावर कुकरची शिट्टी सारखा आवाज काढतो. असे करून तो सतर्क करतो की माझ्या जवळ येऊ नये. ही पिल्ले देखील जन्मताच विषारी असतात म्हणून पिल्लं समजून कोणीही पकडू नये ही माहिती जिगर सोलंकी यांनी दिली.
अशी घ्या काळजी…
तसेच, रात्रीचे बाहेर जातांना टॉर्च आणि बुटाचा वापर करावा. कोणताही साप न मारता जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.
अधिक वाचा –
– तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह गजाआड; लोणावळा शहर आणि INS शिवाजी नेव्हल पोलिसांची कारवाई
– गोमांस वाहतूकप्रकरणी दोनजण ताब्यात; पहाटेच्या सुमारास पोलीस आणि गोरक्षकांची संयुक्त कारवाई । वडगाव मावळ