Dainik Maval News : हिंजवडी जवळील जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातात युवतीचे वडील जखमी झाले आहेत.
हिंजवडी व आसपासच्या परिसरात हे प्रकार सातत्याने घडत असून आजवर अनेक निष्पापांचा बळी गेला. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १७) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली.
तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, हिंजवडी-डांगे चौक रोड, हिंजवडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी ही आपले वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीवरून जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून जात होत्या.
दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास, सावंत पार्क चौकात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यावेळी डंपरच्या (एमएच १४ एचयू ९८५५) चाकाखाली आल्याने तन्वी हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
