व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

जुना मुंबई-पुणे महामार्गावरील देहूगाव कमान ते देहूकडे जाणारा मार्ग (सार्वजनिक बसेस व दिंडीतील वाहनांव्यतिरिक्त) 4 ते 6 मार्चदरम्यान बंद राहणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त देहूगाव येथे 5 मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक व नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून 4 ते 6 मार्चदरम्यान विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

जुना मुंबई-पुणे महामार्गावरील देहूगाव कमान ते देहूकडे जाणारा मार्ग (सार्वजनिक बसेस व दिंडीतील वाहनांव्यतिरिक्त) 4 ते 6 मार्चदरम्यान बंद राहणार आहे. महिंद्रा सर्कल ते फिजिक्स कॉर्नर, कॅनबे चौक, आयटी पार्क चौक, तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा ते देहूगाव मार्ग, आयटी पार्क-कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणीनगर चौक (निगडी) ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्ग, तसेच 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक, काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान आणि परंडवाल चौक या मार्गांवरही वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.

जुना पालखी मार्ग (केंद पाटील चौक ते झेंडे मळा जकात नाका) हा ‌‘वन-वे‌’ करण्यात येणार असून, झेंडेमळ्याकडून केंद पाटील चौकाकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भक्ती-शक्ती चौक, मोशी फाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक, कुंडवडी सर्कल आदी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनतळांची सोय
आळंदी-तळवडे मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजनकाटा, काळोखे पाटील चौक व गायरान परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहू कमान येथून येणाऱ्यांसाठी राधाकृष्ण लॉन्सशेजारील सीओडी जागेत वाहनतळ उपलब्ध राहील. देहू फाटा मार्गाने येणाऱ्यांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, भिगवडी लॉन्स तसेच साईराज चौक ते देहू फाटादरम्यानच्या मोकळ्या जागांमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी पीएमपीएमएल बस पार्किंगचीही व्यवस्था असणार आहे.

देहू परिसरात वाढतीवस्ती आणि मर्यादित वाहनतळ लक्षात घेता भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


Previous Post

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

Next Post

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.