Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे शहरातील सर्व शाळांमध्ये दिनांक 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तळेगाव दाभाडे शहर भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देशाचे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ हे दोन चित्रकलेचे विषय होते. तळेगाव दाभाडे शाळेतील तब्बल 3000 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विषयाला अनुसरून सुंदर चित्रे रेखाटून आपली कल्पकता सिद्ध केली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना लवकरच समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. ( 3000 students participated in painting competition on occasion of Ravindra Bhegde birthday Maval )
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी सोहम येवले (अध्यक्ष) , रोहन श्रीकांत जाधव (उपाध्यक्ष), अथर्व काकडे (उपाध्यक्ष), सुरज भेगडे, ओमकार वटकर, रितेश पारधे, ओंकार साळुंखे, वेदांत पुंड , वेदांत दळवी ,यश जोरकर , तळेगाव दाभाडे शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष गौरव गुंड आदींनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा –
– जांबवली येथील श्री कोंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर मुंबईतील शिवभक्ताकडून चांदीचा पत्रा अर्पण । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– अखेर 22 वर्षांच्या लढ्याला यश ! शेलारवाडी आणि तळेगाव येथील डीआरडीओ संपादित जमिनींना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश