व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटात भाजपाच्या अधिकृत उमेदवार आशाताई वायकर यांच्या नावाचा डंका

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 23, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
name of BJP official candidate Ashatai Waikar is in news in Karla-Khadkala Zilla Parishad group

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विकासाची दृष्टी आणि विकासकामांची पावती या जोरावर आशाताई बाबुरावआप्पा वायकर या कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या आशाताई वायकर यांनी यापूर्वीही कार्ला-खडकाळा गटात घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, तदनंतर आता पुन्हा एकदा पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या मतदारांच्या भेटीस जात असताना सगळीकडे त्यांच्यात नावाची चर्चा होताना दिसत आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुरावआप्पा वायकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मावळ तालुक्यात केलेली विकासकामे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आशाताई वायकर याही समाजकारणात अग्रेसर आहेत. केवळ निवडणुकपुरती आश्वासने न देता प्रत्यक्षात कृतीतून विकासकामे मार्गी लावण्याचे धोरण आशाताई वायकर यांच्याकडे असून तेच धोरण घेऊन आशाताई वायकर या मतदारांपर्यंत पोहचत आहे.

कुठल्याही अपप्रचार आणि खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदार विकासासाठी मला मतदान करतील आणि कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटात देशाचे पंतप्रधान, विकासपुरूष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे आदर्श नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातील उमेदवार म्हणून मला मत देताना या गटात कमळ फुलेल, असा विश्वास आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांनी दैनिक मावळसोबत बोलताना व्यक्त केला.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट असून त्यापैकी कार्ला-खडकाळा हा प्रमुख गट आहे. या गटात महिला सर्वसाधारण असे आरक्षण असून येथे भारतीय जनता पार्टीकडून आशाताई वायकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपाली हुलावळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील लढत ही अत्यंत हायप्रोफाईल लढत होणार असल्याची चर्चा मावळ तालुक्यात असून यामुळे या गटात प्रचारही जोरात होताना दिसत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम


Previous Post

राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना भाजपाकडून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना भाजपाकडून कुसगांव बुद्रुक - काले जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.