Dainik Maval News : देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा हे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज (दि. १५ नोव्हेंबर) मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग को-ऑप. कंपनीच्या पुनर्निर्माणाचा भूमिपूजन सोहळा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांकडून देखील नियोजन करण्यात आले आहे.
भूमिपूजन सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, व्यासपीठाची उभारणी, भव्य मंडप, पाहुण्यांच्या स्वागताची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करणयात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, राज्यातील अनेक मंत्री सह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी गेल्या १५ वर्षांपासून बंद होती. आता कंपनीच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू होत असल्याने या भूमिपूजन सोहळ्याकडे कंपनीतील आजी-माजी कामगारांचे लक्ष लागले आहे. कंपनीत काम केलेले अनेक कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रविवार आठवडे बाजार आज बंद
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या तळेगाव दाभाडे येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नगपरिषद परीसरातील संपूर्ण आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. रोजगाराच्या दृष्टीने भूमीपूजन कार्यक्रम महत्त्वाचा असला, तरी आठवडे बाजार बंद ठेवल्याने अनेक लहान मोठे व्यापारी, शेतकरी वर्ग यांना याचा फटका बसवणार आहे. रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांचं आर्थिक नियोजन कोलमडत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
